About us

व्हिजनरी फाइटर्स

व्हिजनरी फाइटर्स ही एक सामाजिक संस्था आहे जी गरीबांच्या उन्नतीसाठी, समाजातील दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी काम करते.

बेहतर स्कूल

भारतातील डिजिटल विभाजनामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शिकण्याचे नुकसान झाले आहे. तंत्रज्ञान आणि इंटरनेटची उपलब्धता तातडीची गरज असून यापुढे लक्झरी असू शकत नाही. डिजिटल उपक्रमांमुळे भारतातील ग्रामीण शिक्षणामधील काही महत्त्वाच्या समस्या सोडविण्यात मदत होऊ शकते. बेहतर स्कूल हा एक प्रकल्प आहे ज्याचा उद्देश “डिजिटल पायाभूत सुविधा” पुरविणे आणि पुण्याच्या प्राथमिक शाळांना शिक्षणाची संसाधने तयार करण्यात मदत करणे हा आहे

Behtaar School प्रोजेक्ट अंतर्गत, आमच्या टीमने विविध विषयांवर presenation तयार केले आहे, ज्यात विज्ञान, गणित, संगणक, वाचण्यासाठी पुस्तके आणि मूल्य शिक्षण समाविष्ट आहे शिक्षक हे PPT शाळेत स्मार्ट टीव्हीवर सादर करू शकतात. तसेच विद्यार्थी स्वतः शिकण्यासाठी या वेबसाइटचा वापर करू शकतात. आवडीच्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेबसाइटवरील अभ्यासक्रम विभागात जावे लागेल. पीपीटी डाउनलोड करण्यासाठी विषयावर क्लिक करा. Presentation संगणक आणि मोबाईल फोन दोन्हीवर डाउनलोड केले जाऊ शकते. या वेबसाइटवर निरनिराळ्या विषयांवरील नवीन पीपीटी सतत जोडल्या जातील. म्हणूनच या वेबसाइटला भेट देत रहा, शिकत रहा!